हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

एस टी बस उलटली..27 प्रवासी होते बस मध्ये…सुदैवाने जीवित हानी नाही…बस वाहका सह दोन प्रवासी जख्मी

spot_img

 

एस टी बस उलटली..27 प्रवासी होते बस मध्ये…सुदैवाने जीवित हानी नाही…बस वाहका सह दोन प्रवासी जख्मी

सिरोंचा गडचिरोल – (रविकुमार येमुर्ला) : नेहमीप्रमाणे प्रवासी घेऊन अहेरी वरून अमरावती करिता निघालेल्या एसटी महामंडळाच्या अहेरी आगाराच्या बसला अपघात झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली . ही घटना लगाम ते आष्टी रस्त्यावरील धनुर जवळच्या वन विभागाच्या नाक्या जवळ शमीवार दिनांक 25 मे 2024 ला सकाळी 10 वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात वाहकासह दोन महिला प्रवाशी गंभीर जखमी झाल्याने त्यांना अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविले आहे.

प्राप्त माहितीनुसार अहेरी आगाराची एम एच-07 सी-9463 क्रमांकाची बस जवळपास 27 प्रवाशांना घेऊन सकाळी 8.30 वजता अमरावती करीता निघाली. अहेरी वरून वर्धा मार्गे ही बस अमरावती ला जाते. अहेरी वरून जवळपास 35 किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय महामार्गावरील धनुर जवळच्या वनविभाग नाक्याजवळ समोरून येणाऱ्या वाहनाला साईड देताना बाजूला खोल भाग असल्याने बस पलटली.

Advertisements

या वाहनात चालक पी आर मेश्राम आणि वाहक डी एस मेश्राम होते. च्या सोबत जवळपास 27 प्रवासी या वाहनातून प्रवास करत होते. त्यातील वाहक डी एस मेश्राम आणि दोन महिला प्रवाशांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना रुग्णवाहिकेने अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. चेस म्हणजे या बस मध्ये वाहक असलेले डी एस मेश्राम यांची मुलगी सुद्धा प्रवासी म्हणून होती. तिला सुद्धा दुखापत झाली आहे.मात्र सुदैवाने जीवित हानी झाली नाही.लगेच दुसऱ्या बस ला बोलावून सर्व प्रवश्याला पुढील प्रवासा करिता रवाना केले.