हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

इशिका,ईशांत उतीर्ण ..शब्दास्त्र विचार मंचने केला सत्कार

spot_img

इशिका,ईशांत  उतीर्ण ..शब्दास्त्र विचार मंचने केला सत्कार

बडनेरा – इयता बारावी ,दहावीचा नुकताच निकाल लागला आणि यशस्वी विद्यार्थ्यांमधला उत्साह गगणात मावेना,त्यांचा उत्साह आनखी वाढ़ावा व शिक्षणात ऊंच भरारी घ्यावी या  उद्देशाने ‘शब्दास्त्र विचार मंच’ तर्फे यशस्वी पताका रोवणाऱ्या हुशार विद्यार्थी इशिका अविनाश गोंडाने,इशांत अविनाश गोंडाने यांचा सत्कार करण्यात आला.इशिका ही इयता बारावी परीक्षेत उत्तीर्ण झाली तर  ईशांत ने  दहावी परीक्षेत प्रावीण्य प्राप्त 91 टक्के गुण मिळवून यशस्वी झाला. शब्दास्त्र प्रमुख विद्रोही प्रविण कांबळे,लेखक , कवी पद्माकर मांडवधरे ,ज्येष्ठ कवी ठवरे गुरुजी यांच्या हस्ते सन्मान चिन्ह, शाल, पुष्प गुच्छ देऊन यांच्या राहत्या घरी राहुल नगर, जुनी वस्ती, बडनेरा येथे गौरव करण्यात आला.सम्मान प्रेरणा देतो व प्रेऱणेतुन राष्ट्राची निर्मिति होते.

यावेळी धम्म उपासक संघाचे ठवरे गुरुजी ,राऊत सर, भगवान इंगळे यांनी इशिका , ईशांत यांना एक पेन,एक वही भेट स्वरुपात दिली .सत्कार कार्यक्रमाला इशिका, ईशांत यांचे आई , वडील अविनाश गोंडाने,वंदना गोंडाने यांच्यासह दिनेश मेश्राम व मित्र मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.

Advertisements