हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

इतिहासाचार्य मा. म. देशमुख यांना भावपूर्ण आदरांजली,!! मा. म. तुमच्या संशोधनाचे झालेत निखारे पेरलेत बिज प्रबोधनाचे सारेच अंकूररणारे शरीराने जरी तुम्ही आमच्यातून गेलात तरी, पण चमकत राहतील सदा अस्तित्वाचे तारे -कवी खेमराज भोयर

spot_img

इतिहासाचार्य मा. म. देशमुख यांना भावपूर्ण आदरांजली,!!

मा. म. तुमच्या संशोधनाचे झालेत निखारे
पेरलेत बिज प्रबोधनाचे सारेच अंकूररणारे
शरीराने जरी तुम्ही आमच्यातून गेलात तरी,
पण चमकत राहतील सदा अस्तित्वाचे तारे -कवी खेमराज भोयर

कांशीरामजी सोबत मंडल आयोगाच्या चळवळीत तन मन धनाने उभ असलेलं नाव म्हणजेच मा. म. देशमुख..

Advertisements

मला चांगलं आठवते, जवळपास 1997 /98 चा तो काळ होता. माझं गाव भिसी माझ्या गावात एका प्रबोधन सभेचे आयोजन मी व गावातील मित्रमंडळी ने केले. जवळपास सर्व जातीच्या प्रबोधकारांना बोलावण्याची आखणी करण्यात आली. नुकतीच माझी दहावी झाली होती. आणि हे खुळ मला आमचे मामा शैलेंद्र मेश्राम यांच्या माध्यमातून बामसेफ या चळवळीची बीज पेरल्या गेले. आमची टीम बऱ्यापैकी गावात आणि आजूबाजूला काम करायला लागले .

कॅडर कॅम्प च्या माध्यमातून जवळपासच्या 22 गावात प्रबोधनाची चळवळ चालली आणि आता एका मोठ्या सभेचा आयोजन म्हणून शिवजयंतीला या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मा.म देशमुख, सिद्धार्थ पाटील ,पी एच चौगुले , महादेवराव जानकर ,जैबुनिसा शेख, दशरथ मडावी ,संजू ताई गभणे ही सर्व मंडळी कार्यक्रमाला उपस्थित होते. पोलीस स्टेशन सामोरील बाजार चौकात ही सभा होती संपूर्ण बाजार मार्केट खचाखच भरलेलं होतं सर्वांनी आपापल्या परीने जीव तोड मेहनत केली होती .सर्वाची भाषणे अगदी लोकांच्या मेंदूचा ठाव घेणारी होती मा.म.च्या भाषणांनी त्यांच्या मुश्किल कोपरखळ्यांनी नेमका ग्रामीण लोकांच्या मेंदूचा ठाव घेतला होता कार्यक्रमापूर्वी जागृती जथ्थाच्या माध्यमातून दादाजी भोयर म्हणजे माझा बाप जयप्रकाश चहांंदे यांनी अनेक गीत सादर केली. त्याची ही प्रचिती होती असं वाटत होतं की येणाऱ्या निवडणुकीमध्ये बहुजन समाज पार्टीचा उमेदवार आमदार बनेलच बनेल.

कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर पाहुण्यांच्या जेवणाची व्यवस्था माझ्याकडे होती.. आमची परिस्थिती फार तर बऱ्यापैकी होती आणि या पाहुण्यांच्या जेवनात काय द्यायचं हा प्रश्न होता. मी मामांना विचारलं जेवणात सर काय करू? ते म्हणाले.. अरे बाबा मी इथे जेवणासाठी नाही.. प्रबोधनासाठी आलो. पोट भरण्यासाठी जे लागते ते बनव.. माझ्या मायने बेसन भात लाल मिरच्याचा कुचला आणि भाकरी.. बनवली तेव्हा या सर्व मंडळी ने अंगणामध्ये अगदी भारतीय बैठकीत चर्चा करत जेवणाचा आंनद घेतला. नंतर मा. म. सोबत अनेक कार्यक्रमात भेटी गाठी होत. ते आवर्जून बेसण भात भाकरी व लाल मिरची च्या कुचला ची आठवण करुन देत.

Advertisements

भगवान नगरच्या कार्यक्रमात सप्त खंजिरी वादक सत्यपाल महाराज यांचे कीर्तन कार्यक्रमाच्या पूर्वी होतं तेव्हा मा.म.मला स्टेजवर कविता म्हणायला लावली आणि ती कविता कांशीराम साहेबांनी सुद्धा ऐकली. . बहुजन समाजातील मुलांनी वाचावं व प्रबोधनाच्या चळवळीत आपला सहभाग न असावा यासाठी त्यांनी छोटी छोटी महापुरुषांची पुस्तक लिहून ते सामान्यातील सामान्य लोकांना कसे घेता येईल कसे वाचता येईल यासाठी अहोरात्र प्रयत्न करू खऱ्या अर्थाने शाहू फुले आंबेडकर व पंजाबराव देशमुख यांचा वारसा अखेरपर्यंत जपला या महापुरुषांच्या चळवळीचे खरेदी वारसदार होते त्यांच्या प्रबोधन मालेने अनेक इतिहास तज्ञांना घाम फोडला होता जिवंतपणे इथल्या हाफ चड्डी वाल्यांनी त्यांची अंत्ययात्रा काढली होती हे साऱ्या जगाला माहित आहे ह्या प्रबोधन काराला सन्मानाचा जयभीम.

मा. म. तुम्ही तुमच्या लेखणीने बहुजनांच्या प्रत्येक घरात अजूनही जिवंत आहात तुम्हाला पुसता येणार नाही तुम्हाला विसरता येणार नाही.

कवी खेमराज भोयर नागपूर 

Advertisements