आ. विनोद अग्रवाल यांची ऑन द स्पॉट पाहणी
◼️ओव्हर ब्रिजचे काम रेकॉर्ड वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना
◼️’संथगतीच्या कामावर व्यक्त केली नाराजी
गोंदिया. जुन्या ओव्हर ब्रिजच्या जागी त्याच धर्तीवर नवीन पूल बांधण्याच्या कामाला गती देण्यासाठी आज, गुरुवार (ता. 12) आमदार विनोद अग्रवाल यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसह कामाची पाहणी केली.
मनोहर म्युनिसिपल शाळेजवळील दक्षिणेकडील जागेचे काम सुरू करण्याचे निर्देश आमदार विनोद अग्रवाल यांनी दिले. बांधकामातील कोणत्याही प्रकारचे अडथळे दूर करून विहित मुदतीत काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. प्रसंगी आ. विनोद अग्रवाल म्हणाले की, बांधकामाची गती मंदावली असल्याचे दिसून येत आहे. कामाला गती देऊन रेकॉर्ड वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे. पुलाच्या बांधकामाबाबत जागेची अडचण असल्यास नगर परिषदेशी संवाद साधून तो सोडवावा.
पुलाच्या खालच्या भागाच्या दोन्ही बाजूंच्या रस्त्यांच्या बांधकामाची तसेच जागेची पाहणी करून चर्चा करण्यात आली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता चुलपार, उपअभियंता रुद्रकर, अनूप कटरे आदि उपस्थित होते.