आम आदमी पार्टी आणि विदर्भ विकास आघाडी..संयुक्त प्रेस कॉन्फरन्स..! आम आदमी पार्टी सोबत विदर्भ विकास आघाडी करणार कार्य
टिळक पत्रकार भवन नागपुर –1 मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली, तेंव्हा पासून आज पर्यंत विदर्भाचा ज्या प्रमाणात विकास व्हायला पाहिजे होता, त्या प्रमाणात विकास झालेला नाही. विदर्भातील आर्थिक, प्रशासकीय, नौकर भारती आणि सिंचनाचा अनुशेष वाढत जात आहे. विदर्भाची लोकसंख्या आणि भौगोलिक क्षेत्राच्या प्रमणात कधीच विकास निधी मिळत नाही. त्यामुळे विदर्भावर होणारा अन्याय सातत्याने होतच आहे. राज्य स्थापनेच्या वेळी लोकसंख्या २ कोटी ७५ लक्ष होती ती आज वाढून १४ कोटी च्या वर गेली आहे.
३५ जिल्ह्यात विभागलेला महाराष्ट्र १६०० वर्ग किमी पर्यंत पसरलेला आहे. राज्याची राजधानी एका टोकाला आणि संपूर्ण विदर्भ दुसऱ्या टोकाला अशी भौगोलिक परिस्थिती आहे. या मुले विदर्भातील जनतेला प्रशासकीय अडचणीचा नेहमीच सामना करावा लागतो. देशाची राजधानी आणि राज्याची राजधानी जवळपास सारख्याच अंतरावर आहे. विदर्भातील बुलढाणा आणि अमरावती जिल्ह्ये मध्य प्रदेश आणि चंद्रपूर, गोंदिया, भंडारा जिल्हा छत्तीसगड सीमेलगत तर गडचिरोली, चन्द्रपूर आणि यवतमाळ जिल्हे तेलंगना राज्याला लागून आहेत. या जिल्ह्यांमधील अनेक तालुके आदिवाशी बहुल आहेत. तेथे हव्या त्या प्रमाणात आजही विकास न झाल्यामुळे काही तालुके किंवा गावे तेलंगाना राज्यात जायला तयार आहेत, हे आमच्या राज्याचे दुर्दैवच मम्हणावे लागेल.
विदर्भ विकास आघाडी गेल्या अनेक वर्षांपासून स्वतंत्र रित्या विदर्भ राज्य निर्माण व्हावे, विदर्भाचा विकास व्हावा यासाठी कार्य करीत आहे. अनेक विदर्भ राज्य व्हावे यासाठी अनेक संगठना कार्य करीत आहेत. परंतु जे मोठे पक्ष वेगळ्या विदर्भा साठी आंदोलनात आमच्या सोबत अग्रणी होते ते सत्तेवर आलेत, परंतु विदर्भ राज झाले नाही, त्यांनी विदर्भातील जनतेचा घात केला आहे. आजवर म्हणत होते आम्ही आधी विदर्भाचा विकास करू आणि नंतर राज्याची निर्मिती करू, परंतु पाहता पाहता अनेक वर्षे निघून गेलेत, विदर्भाचा विकासही झाल आणि आणि विदर्भ राज्यही झाले नाही.
परंतु देशात नव्याने आलेली आम आदमी पार्टी, दिल्ली आणि आता पंजाब राज्यात सत्तेवर आल्यावर तेथे जो मुलभूत विकास झाल्याचे दिसून येते ते फार महत्वाचे आहे. राज्यातील जनतेसाठी वर्डक्लास शिक्षण व्यवस्था, तळागाळातील नागरिकांना चांगला उपचार मिळावा यासाठी मोहल्ला क्लिनिक व अत्याधुनिक असे मोठ मोठे हॉस्पिटल उभारण्याचे कार्य होत आहे, जनतेला मोफत वीज, पाणी, महिलांना बस प्रवास इत्यादी अनेक जनकल्याणाच्या योजना राबविण्याचे कार्य दिल्ली आणि पंजाब राज्यात होत आहे. पंजाब मध्ये शेतकऱ्यांना मोफत वीज, शेतमालाला MSP पेक्षा जास्ती भाव देवून सरकारी खरेदी हे वाखण्याजोगे आहे. अनेक नाविन्यपूर्ण योजना राबविण्यात हे दोन्ही सरकार यशस्वी झाले आहेत. यावरून असे दिसून येते की आम आदमी पार्टी देशाचे भविष्य आहे.
आम आदमी पार्टी स्थापनेपासून छोटे राज्य असावेत या विचारधरेशी बांधील आहे. पार्टी चे म्हणणे आहे की छोटे राज्य असल्याशिवाय नागरिकांना चांगली प्रशासकीय व्यवस्था आणि न्याय मिळू शकत नाही. राज्यांचा म्हणजे जनतेचा विकास होऊ शकत नाही, जनता प्रशासनापर्यंत आणि प्रशासन जनतेपर्यंत पोहचू शकत नाही, त्यामुळे छोटे राज्य झाले पाहिजेत. त्यामुळे आम्ही विचार पूर्वक निर्णय घेतला आहे की भविष्यात राजकीयदृष्ट्या आम आदमी पार्टी सोबत विदर्भ विकास आघाडी संयुक्तपणे कार्य करेल. भविष्यात होणाऱ्या निवडणुका तसेच विदर्भातील जनतेच्या प्रश्नावर सोबत आंदोलनात्मक भूमिका घेतली जाईल.
आज प्रेसकॉन्फरन्स ला राज्य कोषाध्यक्ष जगजीत सिंग, विदर्भ संयोजक डॉ देवेंद्र वानखडे, विदर्भ विकास आघाडीचे अध्यक्ष अनिल जवादे, अंबरीश सावरकर राष्ट्रीय परिषद सदस्य, अशोक मिश्रा राज्य IT हेड, प्रमोद भोंबले वर्धा जिल्हा संयोजक, गोरख भगत, भारत पाटील, महेश माकड, दिनेश वाघ, राजेंद्र पाटील, विशाल परधने, चंद्रकांत नग्रारे, अशोक धाले, सुनील खैरे, अविनाश रडके, चंद्रकांत भोयर, संदीप जेनेकर, गोपाल मांडवकर, जयंत धोटे, दीपक भातखोरे, स्वप्नील सोमकुवर, प्रभात अगरवाल, फइम अन्सारी, नरेश महाजन, मंगेश शेंडे इत्यादी उपस्थित होते.