आम्ही कोणत्याही पक्षाचे मुलाजीम नाही आमच्या मागण्या कडे दुर्लक्ष करून चालणार नाही .
बागडे!
मुम्बई – आमच्या मागण्या रास्त आहेत त्याचे कोणी बोलविता धनी नाही समाजाचे दुःख आणि त्यांच्या भावनेच्या कधी बाजार होऊ न देता निस्वार्थी कार्यकर्ते यांच्या वेदनेचा हुंकार करणारे हे कार्यकर्ते आहेत ते कोणत्याही पक्षाचे मुलाजीम नाही असे आज बागडे सरांनी ठणकावून सांगितले ते आज आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा आंबेडकरी महिला मोर्चा च्या वतीने मंत्रालयावर धडक मोर्चा काढून नारे निदर्शने करताना आझाद मैदान मुंबई येथे बोलत होते.
माई रमाबाई आंबेडकर यांचे स्मारक वरली स्मशानभूमी येथे झाले पाहिजे, अंबाझरी उद्यान येथिल सांस्कृतिक भवन उभारण्यात यावे, घरकाम मोलकरीण यांना दर महिन्याला पेंशन ५००० मिळाले पाहिजे, घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त दरात मिळाले पाहिजे,२०० युनिट वीज बिल मोफत देणे, कलावंत गायक यांना पेंशन योजना लागू करा, दादा साहेब गायकवाड स्वाभिमानी योजना अंतर्गत शेती करीता निराधार घटस्फोटीत विधवा महिलांना जमीन देणे,
इत्यादी मागण्यासाठी भव्य मोर्चा काढण्यात आला, मोर्चा मध्ये पौर्णिमा पाईकराव, शारदा बागुल, लता भालेराव, गंगा चव्हाण, आरती भोईर, उषा मनोहर, सुनिता गायकवाड, ज्योती वागदे, शितल बूरबूरे, संतोषी भंडारी, प्रिती थुल, सुरेखा झांबरे, नंदा बनसोडे, किरण गजभिये, शकुंतला गावंडे, आशा शाह,सपना गुप्ता, कविता पुणेकर, नजराणा शेख रुबीना शेख, संगिता झेंडे, सुनिता सोनवणे, जयश्री मसराम,प्रा.रमेश दुपारे सुरेश कपूर, राशिद अली, प्रकाश कांबळे, धर्मा बागडे, दादाराव पाटील, सुधाकर टवले, देवेंद्र बागडे,शरद बनसोडे, नितीन तायडे, सुधाकर बोरकर, आणि मोठ्या संख्येने महिला पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते.