हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

आज वा उद्या ऐवजी ; ‘काल’ चे वाढते महात्म्य ! –  रणजीत मेश्राम

spot_img

 

आज वा उद्या ऐवजी ;
‘काल’ चे वाढते महात्म्य ! –  रणजीत मेश्राम

बाबासाहेब आंबेडकरांचे स्मरण करतांना एका मानसिक द्वंद्वाकडे लक्ष द्यावे लागेल. हे द्वंद्व स्पष्ट दिसत नाही. पण परिणामघेई आहे.
या द्वंद्वाची स्पष्टता करायचीच तर, वैचारिकता काल’ कडे की आज उद्या’ कडे या वळणाने करावी लागेल.

भारतीय, काल मध्ये खूप रमतो. आमचे दिवस .. आमची संस्कृती .. आमची थोरता .. वगैरे ! या मनोरचनेवर हिंदुत्वाचा ताबा असतो. यातून अद्याप सुटका नाही. किंबहुना अधिक घट्ट होतेय. ही घट्टता इतरांनाही आपल्या कवेत घेतेय.
आंबेडकरी विचारसरणीने तो ताबा येऊ न देणे हितावह ठरेल. कदाचित ते बाबासाहेब आंबेडकरांचे पूज्यस्मरण ठरु शकेल. ते कसे?

Advertisements

जर असे झाले तर अंमल .. अवलोकन .. परीक्षण .. निदान यांचे महत्त्व वाढेल. स्मृती तुलनेत कृती मोलाची ठरेल. वैचारिक प्रवास तसा जाईल. कालचे प्राबल्य कमी होईल. जोडीला आज व उद्या येतील. अशी सम्यकता येणे फार गरजेचे आहे. ती आज आणि उद्या कडे झुकली तर अधिकच चांगले !
अर्थात कालच्या घटनांत रमणे प्रमाद नव्हे. पण त्यातच रमणे हिताचे नसते. विकास .. उन्नयन .. सुखावहता ही स्थिती आज आणि उद्यात आहे. ती वाहती असावी. कसोटीवर असावी.साचती.. थांबती नको. तोच आंबेडकरवाद !

हिंदुत्वाने वैचारिकतेच्या विविध प्रसूतीस्थळावर असाच ताबा केलेला ! शक्तीस्थळे दुर्बळ केली ! ती एकप्रकारची गुंगी असते. नेहमी काल कडे नेते.
‘कशासाठी’ .. हेच नेमके विचारायचे थांबवू पाहते. ते नेमके पहावे. गुंगी सहज उतरुन जाईल.

जे जे आंबेडकरांनी पूढचे सांगितले त्याचे काय ? जे धोके सूचित केले त्याचे काय ? ते मूल्यमापन कोण करेल ? खरेतर तीच मोठी जबाबदारी ! ते खरे स्मरण !
पुतळा, स्मारक, दिवस यांना मर्यादा आहेत. प्रासंगिकता आहे. ते अंतिम नव्हे. थांबा आहे. प्रवास नव्हे. तिथेच थांबणे भयंकर होईल. तिथे उर्जा घेऊन पूढे निघावे.
रोजच्या रोज लक्ष्य दूर जातेय. तो काळजीचा विषय ठरावा. लेखनाचा विषय व्हावा.

Advertisements

म्हणून काही विचारसरणींनी पुतळा वर्ज्य केलाय. ते टोकाचे होईल. आपण सम्यकमार्गी. आपल्याला समतोल, संतुलन साधता येतो. तो साधावा. आता तोच अग्रक्रम.
अक्षरबध्द बाबासाहेब परत परत नवनव्या वेष्टणात किती दिवस ? ते सूत्र घेऊन पुढचे सांगावे. जर संविधान देतांना .. ‘अन्यथा, सामाजिक – आर्थिक विषमता वाढत जाईल’. .. असे जे बाबासाहेबांनी म्हटले .. ती कशी वाढली हे सांगायला ते परत येणार नाहीत. ती जबाबदारी आपली !
‘अर्थव्यवस्था विधीमंडळाच्या इच्छेवर न सोपविता घटनात्मक विधीनियमाद्वारे ती निश्चित व्हावी’ असे जे बाबासाहेबांना वाटायचे. ते कसे ?
नवे संदर्भ घेत कोण सांगेल ? अशी कामांची आरास पुढ्यात पडली आहे. तेव्हाच निदान सापडेल. भक्तीमार्गात अल्पसंतुष्टीची साठवण सापडते.

अंधार का असतो ? कारण तिथे प्रकाश नसतो. प्रकाशाचा थेट संबंध आंबेडकरवादाशी आहे. आधी प्रकाश न्यावा. अंधार ओळखता येतो. तो सरतो. प्रकाश नेणे महत्वाचे. ते आज उद्याशी जुळलेले आहे.

आपण तसेही उजेडमार्गी ! आपली जबाबदारी मोठी आहे. भवताल आपल्याकडे आस घेऊन आहे. लघुवाट आपली सोबती नाहीय. कालची कूस, उद्यासाठी प्रसवशील ठेवावी. अन्यथा वांझपण यायचे ! ती दक्षता मोलाची. उत्सवात हरवू नये.
आपण संकल्पयात्री आहोत. हे आव्हान घ्यावे. आपोआप नवनवे सूचेल. नवे विषय सूचतील. निरीक्षणाचा आवाका वाढेल.

Advertisements

काल मध्ये संतुष्टी होत राहील. आता नवे. आजचे. उद्याचे. परवाचे. आव्हानांचे. सर्वसामान्य प्रवाहही तिकडेच येईल. हेही स्मरणच. बाबासाहेबांचे !

■ प्रा. रणजित मेश्राम नागपुर

साभार फेसबुक रणजीत मेश्राम