आंबेडकरी चळवळी ला दिशा देत असलेले प्रा गंगाधर अहिरे यांची माझ्या निवासस्थानी भेट-राजन वाघमारे
———————————————————————
आंबेडकराईट मुव्हमेंट कल्चर अँड लिटरेचर या संस्थेच्या वतीने पुरस्कार वितरण समारंभाला पुरस्कार स्विकारण्यासाठी नाशिक वरून काल नागपुरात दाखल झाले त्यांचे स्नेही मित्र माननीय सुधिरजी भगत त्यांच्या सेवत दाखल झाले…..
नागपूर स्टेशनवर येताच मला फोन केला तब्येत कशी आहे. सध्या दोन दिवसांपासून बरं वाटतं आहे.मी गेल्या 22 मार्च पासून आजारी होतं. तरी मी सांगितले पुरस्कार वितरण समारंभाला मी येणार आहे म्हणून………
कार्यक्रम आटोपून भेटीगाठी घेऊन घरी निघाले परत रात्री फोन आला मी उद्या घरी येतो भेटायला……या नक्कीच असं म्हणुन फोन ठेवला…….
कार्यक्रमाला काभुराज बोढारे व त्यांच्या सोबत डॉ दुनबुळे हे हेही नागपुरात दाखल झाले. ही सर्व मंडळी मान. सुधीरजी भगत यांच्या निवासस्थानी वास्तव्याला होते.
काभुराज बोढारे एक मोठे व्यक्तीमत्व सामाजिक व धम्म क्षेत्रात मुंबईतल एक मोठं नाव, काभुराज बोढारे यांची आई म्हणजे शांतकला बोढारे ह्या 1964,,65 या वर्षी भुमीहिनाच्या सत्याग्रह जेलभरो आंदोलनात ते असताना नाशिक च्या जेलमध्ये शांताकला आईची प्रसुती झाली आणी मुलं झाले. ते ,मुल म्हणजे काभुराज ते राज्य उत्पादन शुल्क विभागात शासकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
त्यांची भेट भगत साहेब मार्फत 2006 साली धम्म दिक्षा सुवर्ण महोत्सव वर्षे होत तेव्हा मुंबईत भेट झाली पहील्याच भेटीत खुप झाल्या, आणी मी सतत त्यांच्या संपर्कात असायचं
त्याचं कार्य पाहून 2009 वर्षी दुसऱ्या अ.भा. आंबेडकरी युवा साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमाला त्याचा गौरव करण्यात आला………
ही मंडळी आज माझ्या छोट्या घरात त्याचं आगमन होताच दारातून म्हणाले अंतरंग हे नाव हे कसं ठेवलं त्यांना एक आठवण सांगितले मी सुरेश भटांच्या सहवासात आलो आणी हे नाव त्यांच्या कडून घेऊन ठेवण्यात आले. एकदा त्यांनी सुध्दा घरी भेट दिली. त्या काळात सोशल मीडिया नव्हते फोटो ग्राफर ठेवण्यातच प्रश्न नाही. कार्यकर्ता खिशा हा रिकामंच,हे सर्व ऐकत असताना खुप आनंद झाला……….
नाष्टा चहा घेत असताना अस्मितादर्श साहित्य संमेलनाच्या नागपुरात जबाबदारी तुम्ही घ्या असा आग्रह त्यांच्या कडून होत होतं ………साहीत्य चळवळीवर अनेक विषयांवर चर्चा व सामाजिक न्याय विभागाच्या वतीने विदेशात मुलांना पाठवितात त्याची विस्तृत माझ्या कडून विचारणा केली.
कसा एक तास गेले काही कळले नाही पुढच्या प्रवास डॉ यशवंत मनोहर यांच्या घरी …….. सायंकाळ ची ट्रेन होती
आजच्या माझ्या घरी भेटीसाठी डॉ मच्छिंद्र चोरमारे, सुधीरजी भगत डॉ दुनबळे काभुराज बोढारे, गंगाधर अहिरे आले. याचा मला मनस्वी आनंद झाला ……
कार्यकर्ताची विचारपुस करायलाच जेव्हा मोठी मंडळी येत असते तेव्हा तो एक कार्यकर्ता चा सन्मान असतो हेच ख-या कार्यकर्ता ला अपेक्षा असते, आज बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे स्मृती दिवस भावपूर्ण आदरांजली…….,
राजन वाघमारे
रिपब्लिकन कार्यकर्ता
अंतरंग निवास मेन रोड पंचशील नगर
नागपूर 17