हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

आंतरराज्यीय अमली पदार्थ तस्करांच्या टोळीचा पर्दाफाश, 4 कोटींचा 190 किलो गांजा जप्त

spot_img

मुंबईत एनसीबीने जप्त केलेले अमली पदार्थ: एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या बदलीनंतर मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. मुंबई एनसीबीने भिवंडी परिसरातून 190 किलो गांजासह 4 जणांना अटक केली आहे. या कारवाईत अमली पदार्थ तस्करांच्या दोन गाड्याही जप्त करण्यात आल्या आहेत. हे 190 किलो ड्रग्ज मुंबई आणि आसपासच्या पब, डिस्को थॅक्स आणि ड्रग अड्ड्यांमध्ये पुरवले जात होते.

एनसीबीने अटक केलेले सर्व आरोपी मुंबईचे रहिवासी आहेत. हे आरोपी गेल्या ५ वर्षांपासून मुंबईच्या पूर्व उपनगरात मुलुंड आणि भांडुपमध्ये गांजा आणि इतर अंमली पदार्थांची तस्करी करत होते. काही दिवसांपूर्वी या टोळीने ओडिशाहून मुंबईत मोठ्या प्रमाणात गांजा मागवला होता. एनसीबीला त्यांच्या सूत्रांकडून याबाबत माहिती मिळाली. याअंतर्गत गेल्या काही महिन्यांपासून एनसीबीचे अधिकारी संशयित आरोपींच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते.

गुप्त माहितीच्या आधारे अटक
एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमली पदार्थांच्या तस्करीची पुष्टी माहिती मिळाल्यानंतर एनसीबीने वेगवेगळी टीम तयार करून सापळा रचला. ही टोळी अमली पदार्थांचा साठा करत असल्याची माहिती एनसीबीला मिळाल्यानंतर एनसीबीने सापळा रचून भिवंडी टोलनाक्यावरून अमली पदार्थ जप्त केले.

गेल्या पाच वर्षांपासून तो तस्करीच्या व्यवसायात होता
आरोपीकडे चौकशी केली असता तो समाधानकारक उत्तरे देत नव्हता. यावेळी त्यांच्या वाहनांची सखोल झडती घेण्यात आली. कारमध्ये 190 किलो गांजा सापडला. हा गांजा गाडीत विशिष्ट ठिकाणी पोकळी बनवून लपवून ठेवला होता. दरम्यान, एनसीबीच्या अधिकार्‍यांनी या आरोपींची चौकशी केली असता, त्यांनी अंमली पदार्थांच्या तस्करीत सहभागी असल्याची कबुली दिली. तपासात हा आरोपी दारू तस्कर असल्याचे उघड झाले असून तो गेल्या ५ वर्षांपासून अवैध दारू तस्करीचा व्यवसाय करत असल्याचे सांगण्यात येत आहे.

ड्रग्ज कुठून आणले जात होते?
एनसीबीच्या तपासात हे अमली पदार्थ या टोळीने विशेषतः आंध्र प्रदेश, ओरिसा या राज्यांतून आयात केल्याचेही निष्पन्न झाले. ही टोळी मुंबई आणि आसपासच्या अनेक स्थानिक व्यापाऱ्यांना ड्रग्जचा पुरवठा करत असे. याप्रकरणी एनसीबी अधिक तपास करत आहे. मुंबई आणि परिसरातील कोणते ड्रग्ज तस्कर त्यांच्या संपर्कात होते आणि ते अमली पदार्थ कोठून पुरवठा करत होते, याचा तपास सुरू आहे.

बँक फसवणूक प्रकरण: सर्वात मोठ्या बँकिंग घोटाळ्यात सीबीआयचे छापे, कोट्यवधींचे हिऱ्यांचे दागिने, घड्याळे आणि पेंटिंग जप्त

Breaking News Live: PM मोदींच्या हस्ते बुद्धिबळ ऑलिम्पियाडचे उद्घाटन, 160 हून अधिक देशांचा सहभाग

,