हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

अन् दाखल्यासाठी गेलेल्या युवकाच्या कानशिलात महिला सरपंचाने हाणली ◼️लाडकी बहिण योजना : नवेगावबांध येथील प्रकार ◼️ पोलिसात तक्रार दाखल

spot_img

अन् दाखल्यासाठी गेलेल्या युवकाच्या कानशिलात महिला सरपंचाने हाणली

◼️लाडकी बहिण योजना : नवेगावबांध येथील प्रकार

◼️ पोलिसात तक्रार दाखल

Advertisements

गोंदिया : लाडकी बहीण योजनेसाठी लागणाऱ्या दाखल्याची जमवाजमव करत असताना ग्रामपंचायत कार्यालयात जन्माचा दाखला मागण्यासाठी गेलेल्या युवकाच्या महिला सरपंचाने कानशिलात हाणल्याची घटना जिल्ह्यातील अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील नवेगाव/बांध येथे 4 जुलै रोजी घडली. या प्रकरणी सदर युवकाने नवेगावबांध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

महाराष्ट्र शासनाने राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु केली असुन या योजनेसाठी घरातील अनेक कर्ते पुरुष व युवक दाखले, कागदपत्र गोळा करण्यासाठी धावपळ करीत आहेत. त्यातच 4 जुलै रोजी आशिष सुभाष लंजे (वय 20) हा युवक जन्माचा दाखला मागण्यासाठी नवेगाव/बांध येथील ग्रामपंचायत कार्यालयात गेला असता पैशाचा हिशोब न दिल्याचे कारण पुढे करुन महिला सरपंच हिराबाई पंधरे यांनी त्या युवकाच्या कानशिलात हाणली. सदर युवक आशीष लंजे हा नवेगाव/बांध येथील रहिवाशी असुन ग्रामपंचायत नवेगाव/बांध येथील ग्रामपंचायत वन समितीच्या वतीने राष्ट्रीय उद्यानाच्या हिलटॉप गार्डन वरती काम पाहत होता. येणाऱ्या- जाणाऱ्या पर्यटकांकडून प्रवेश पास देऊन पैसे गोळा करण्याचे कार्य त्याच्याकडे होते. तर काही दिवसांआधी त्याला कामावरून काढण्यात आले होते. सरपंच हिराबाई पंधरे यांना आशिष लंजे याने पैशाचा हिशेब दिला नसल्याने सदर युवक ग्रामपंचायत कार्यालयात दाखल्यासाठी आला असता, सरपंच हिराबाई यांच्याशी त्याचा वाद झाला.

दरम्यान, त्यांनी त्याच्या कानाखाली वाजवली. तर तसे पोलीस ठाण्यात कबूलही केले. दरम्यान, या प्रकरणी सदर युवकाने सरपंच हिराबाई पंधरे यांच्या विरोधात पोलीस स्टेशन नवेगाव/बांध येथे तक्रार नोंदवली असून (BNS) भारतीय न्याय सेवे अंतर्गत 115 (2) अंतर्गत एन.सी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
०००००००००

Advertisements