हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

अग्नीवीर सैन्यभरती मेळावा 10 जूनपासून

spot_img

अग्नीवीर सैन्यभरती मेळावा 10 जूनपासून
नागपूर, : विभागीय क्रीडा संकुल मानकापूर येथे 10 ते 17 जून या कालावधीत अग्नीवीर सैन्यभरती मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. बुलढाणा वगळता विदर्भातील दहा जिल्ह्यातील उमेदवार या भरती मेळाव्यात सहभागी होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर पत्रकार परिषदेत दिली.

सैन्यभरती कार्यालय नागपूरचे संचालक कर्नल आर. जगथ नारायण, लोकल मिलिटरी अथॅारिटी जीआरसी कामठीचे ले. कर्नल भुवन शहा, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी डॅा. शिल्पा खरपकर यावेळी उपस्थित होते.
अग्नीवीर भरतीसाठी ऑनलाईन परीक्षा मार्च 2023 मध्ये घेण्यात आली. त्याचा निकाल 20 मे रोजी जाहीर करण्यात आला. या परीक्षेमध्ये उत्तीर्ण उमेदवारांनाच या मेळाव्यात प्रवेश देण्यात येणार आहे. आपले सरकार केंद्राच्या मदतीने येणा-या उमेदवारांच्या सर्व कागदपत्रांची पडताळणी करयात येणार आहे.
जिल्ह्यातील जास्तीत जास्त स्वयंसेवी संस्थांनी या मेळाव्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.