हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

अखिल भारतीय मराठा महासंघ नागपूर तर्फे निषेध आंदोलन..!मराठा महासंघाची महाराष्ट्र बंदची हाक

spot_img

अखिल भारतीय मराठा महासंघ नागपूर तर्फे निषेध आंदोलन..!मराठा महासंघाची महाराष्ट्र बंदची हा

नागपुर – मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मराठा समाजाचे असताना देखील जालना जिल्ह्यातील अंतरावली सराटी येथे मराठा आरक्षण मागण्यासाठी आलेल्या आंदोलकांवर तेथील SP व जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार अमानुष लाठी चार्ज केला गेला.
मराठा समाजाचे नेते मनोज जरंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा तरुण, महिला, वृद्ध, लहान मुले असे हजारोंच्या संख्येने अंतरावली सराटी या गावी मागील चार दिवसापासून उपोषणाला बसले असताना आज दि. १ सप्टेंबर रोजी अचानक पन्नास ते साठ गाड्या भरून पोलिसांचा ताफा तिथे पूर्ण तयारीने आला आणि त्यांनी अचानक हा हल्ला चढविला.


त्यांच्या या अमानुष हल्यामध्ये महिला, तरुणांची डोके फुटली घराघरात घुसून महिलांना मारहाण करण्यात आली.
अश्रृ धुराच्या नळकांडे सोडण्यात आल्या. आणि गोळीबार ही करण्यात आला. हा अमानुष हल्ला करून आंदोलन धुडकावून लावण्याचा प्रयत्न केला गेला. शांततेत चालू असणारे हे आंदोलन अचानक पेटले‌. जे नको होते तेच झाले.

Advertisements

अनेक ठिकाणी या लाठी हल्ल्याचा निषेध होत आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मराठा समाजाचे असून सुद्धा ही दुर्दैवी घटना घडली. यामुळे सर्वंच मराठा समाज सरकारवर नाराज आहे. आणि मराठा महासंघाने जालना चे SP व जिल्हाधिकारी यांना त्वरित निलंबित करण्याची मागणी केलेली आहे. कारण हा दुर्दैवी लाटी हल्ला SP व जिल्हाधिकारी यांच्या सांगण्यावरून झाला असे सांगण्यात येत आहे.

५४ पेक्षा जास्त लाखोंचे मोर्चे मराठा समाजाने शांततेत काढून जगभरात नाव केले होते. पण या लाठीचार्ज मुळें हा शांततेत होत असलेल्या आंदोलनाला कुठेतरी चिघळण्याचे प्रयत्न केल्या गेले आहे. त्यामुळे आंदोलनाला गालबोट लागले आहे. ठिकठिकाणी उद्या दि. २ सप्टेंबर रोजी मराठा समाजाने तातडीची बैठक बोलवण्यात आलेली आहे. आणि मराठा महासंघातर्फे महाराष्ट्र बंदची हाक देण्यात येणार असून या हल्ल्याचा अखिल भारतीय मराठा महासंघ नागपूर तर्फे जाहीर निषेध करण्यात येत आहे. जर दोषींवर त्वरित कार्यवाही झाली नाही तर अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने राज्यभर आंदोलने करण्यात येईल.

असा इशारा राष्ट्रीय संपर्क प्रमुख दिलीप धंद्रे विदर्भ पुर्व अध्यक्ष शशिकांत होणे, नागपूर महानगर अध्यक्ष तेजसिंग मोरे यांनी दिला आहे.

Advertisements