हमारा WH वेब न्यूज़ चैंनल है। आम जनता की समस्याओं पर प्रकाश डालने का कार्य करता है। हर तबको की खबरें प्रमुखता से प्रकाशित करने का दायित्व निभाते। देश की एकता अखण्डता रखने के लिए हर प्रयास करते है। किसान,बेरोजगारी,शिक्षा,व्यापार,की ख़बर प्रमुखतासे दिखाने प्रयास करते है। किसी भी जाती धर्म की भावनाओं को ठेच पहुँचानी वाली खबरों से हम दूर रहते है। देश की एकता ,अखंडता को हम हमेशा कायम रखने के लिए कार्य करेंगे। तो हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

अकोल्यात कांग्रेसला मोठा धक्का..! -कांग्रेस नेते आकाश शिरसाट यांचा वंचित आघाडीत पक्ष प्रवेश -आकाश शिरसाट यांच्या पक्षप्रवेशाने वंचितला महानगरात बळकटी येणार – ॲड. आंबेडकर अकोला

spot_img

अकोल्यात कांग्रेसला मोठा धक्का..!

-कांग्रेस नेते आकाश शिरसाट यांचा वंचित आघाडीत पक्ष प्रवेश

-आकाश शिरसाट यांच्या पक्षप्रवेशाने वंचितला महानगरात बळकटी येणार – ॲड. आंबेडकर

Advertisements

अकोला : शहर काँग्रेस कमिटीचे सचिव तथा अनुसूचित जाती विभागाचे माजी महानगराध्यक्ष आकाश सहदेवराव शिरसाट यांनी आज काँग्रेसला सोडचिठ्ठी देत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड
प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते वंचित बहुजन आघाडीमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला.

आकाश शिरसाट हे विद्यार्थी दशेपासून काँग्रेस पक्षात सक्रिय होते. त्यांनी NSUI विद्यार्थी काँग्रेस अकोला जिल्हा महासचिव, अकोला युवक काँगेस सचिव, अकोला शहर युवक काँग्रस उपाध्यक्ष, अकोला शहर अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष अशी अनेक पदांवर काम केलेले आहे. त्यांनी ऐन निवडणुकीच्या काळात आकाश शिरसाट यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने याचा मोठा फटका काँग्रेसला बसला आहे. त्यांनी त्यांच्या काँग्रेसच्या काळात अनेक आंदोलने मोर्चा निदर्शनामध्ये सहभाग घेतला होता. आकाश शिरसाट यांच्या पक्षप्रवेशामुळे वंचित आघाडीला महानगरात बळकटी येणार असल्याचे मत ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांनी व्यक्त केले.

पक्षप्रवेशावेळी वंचितचे जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे, माजी नगरसेवक गजानन गवई, जीवन डिगे, राहुल शिरसाट, उमेश गोपणारायन, किरण शिरसाट, अंगद शिरसाट, रामेश्वर मोरे, आशिष शिरसाट, योगेश मालोकार, विनोद वानखडे, आकाश वानखडे, सुनिल गीते, जय वानखडे, जितेंद्र गवई आदींची उपस्थिती होती.

Advertisements