अंजली सुनील भोयर यांचे कुटुंबासह बेमुदत उपोषनावर
कुही (गुरुदेव वनदुधे ) तालुक्यातील गट ग्रामपंचायत फेगड येथे काही कालावधीसाठी प्रशासक असतांना येथे आशा वर्कर ची नेमनुक करायची होती त्यासाठी 29/8/2022 ला प्रशासकीय यंत्रणेने सोपस्कार पुर्ण करीत ग्रामसभेचे आयोजन केले होते. त्यामध्ये आठ महिलांनी आपले फार्म भरले होते व त्यांची गुनांकानुसार निवड करायची होती त्यामध्ये अंजली सुनिल भोयर हीला सर्वाधिक 8.5 गुण होते मात्र गावातील राजकीय पाठबळ नसल्याने त्या सभेत आशा वर्कर निवडीचा निर्णय राखून ठेवण्यात आला. त्यानंतर ग्रामपंचायतची निवडूक लागली व नविन सरपंच आशीष रामभाऊ पाल यांनी ग्रामसभा बोलावली त्या ग्रामसभेत आशा वर्करच्या निवडीवर चर्चा करण्यात आली.
त्यामध्ये सत्ताधा-यांनी मागील सभेतील सर्वाधिक गुन असलेल्या महिलेला नियुक्ती देण्याचे क्रमप्राप्त असतांना आशा वर्करचा फार्म भरते वेळी एक महिला विधवा नसतांना विधवा आहे अशे दर्शवून नव्याने अर्ज मागवुन पुन्हा ग्रामसभा घेवून नव्याने नियुक्ती करण्याचा ठराव ग्राम सभेतील नागरीक घरी गेल्यानंतर पंचवीस ते तिस गावक-यांच्या साक्षीने घेण्यात आला. यावर तक्रार कर्त्या अंजली सुनील भोयर यांनी प्रश्न उपस्थित केला की शासनाने आशा वर्कर साठी ग्रामपंचायत ला गुनांकानुसार नियुक्ती करण्याचे आदेश दिले असतांना मला सर्वाधिक गुन आहेत तरी पन मला नियुक्ती देण्यास ग्रामपंचायत टाळाटाळ करीत आहे त्यासाठी मी रीतसर मुख्य कार्य पालन अधिकारी जि. प. नागपूर. उपमुख्य कार्य पालन अधिकारी (पंचायत) जि. प. नागपूर. मा. जिल्हा आरोग्य अधिकारी नागपूर. गटविकास अधिकारी कुही. यांच्या कडे तक्रार दाखल केली मात्र त्यावर तक्रार अर्जानुसार मा. उपायुक्त (आस्थापना) विभाग नागपूर यांनी दिनांक 02/01/2023 रोजी दिलेल्या निर्देशानुसार कार्यवाही न करता गट ग्रामपंचायत फेगड प्रशासनना कडून दिनांक 11/22/2023 रोजी नियमबाह्य विशेष आमसभा बोलावून त्यामध्ये यापूर्वी राबविण्यात आलेली निवड प्रक्रिया रद्द करण्याचा ठराव पारित करुन माझ्यावर अन्याय केला त्यासाठी अंजली सुनील भोयर यांनी 3/4/2023पासुन पती दोन मुले सह चार लोकांच्या कुटुंबानी बेमुदत आमरन उपोषन सुरू केले आहे.
परंतु आजतागायत याकडे शासन प्रशासनाने डोळेझाक करीत त्याकडे कुणीही बघत नसल्याचे दिसत आहे. जोपर्यंत मला न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरुच राहील अशे उपोषन कर्त्यांचे म्हणने आहे.
क़ाय म्हणाले सरपंच ….प्रशासनाच्या कार्यकाळात अनिर्णीत राहिलली निवड प्रक्रिया पूर्ण करण्याच्या दृष्टीने आम्ही ग्रामसभा घेतली असता पुन्हा निवड प्रक्रिया राबवून निवड करण्यात यावी अशे ग्रामसभेने ठरविले त्यामुळे ही प्रक्रिया नव्याने राबुन योग्य आशा स्वयंसेविकीचे निवड करण्यात येईल.
रामभाऊ पाल सरपंच गट ग्रामपंचायत फेगड